गावभेट जनसंवाद पदयात्रेदरम्यान येसवडीचे माजी सरपंच संजय पिसे यांचा पदाधिकारी , कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश 

Google search engine

 

गावभेट जनसंवाद पदयात्रेदरम्यान येसवडीचे माजी सरपंच संजय पिसे यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील , आमदार प्रा .राम शिंदे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य दगडु कांबळे , आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी बोलताना माजी सरपंच संजय पिसे कर्जत जामखेड मतदारसंघात यावेळी आपला भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे , भूमिपुत्र आ. प्रा. राम शिंदे यांना साथ देवून यावेळी त्यांनाच आमदार करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. गावभेट जनसंवाद पदयात्रेदरम्यान आ. राम शिंदे यांना जोरदार जनसमर्थन मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे विधानसभा २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे.विद्यमान आमदारांनी कोणतेही विकास कामे न करता पोकळ आश्वासन दिली पण कुठलेही काम केलं नाही , विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना मतदानासाठी ग्रामस्थ , नागरिकांच्या आरोग्याचा गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत .