
झरेकाठी ता.संगमनेर येथील राकेश वाणी यांना भगवंत विश्वविद्यालय , अजमेर राजस्थान येथून नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी फॉर्मुलेशन अँड इव्हूलुऐशन ऑफ नॅनो इम्लशन यूजींग अँटी इपीलेप्टिक ड्रग व्हाया नोज टू ब्रेन डिलिव्हरी सिस्टीम या शोध कार्यावर प्रबंध सादर केला होता.त्यांना डॉ. अनुप सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
ते सद्ध्या फ्रेयर सॉफ्टवेअर सर्व्हिसेस ,हैदराबाद , येथे रेग्युलेटर अफेअर्स विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत . त्यांना नुकताच इंटरनॅशनल अवॉर्ड चा सर्वात्तम पुरस्कार मिळाला. त्यांनी ६ इंटरनॅशनल व ५ नॅशनल जर्नल्स शोधनिबंध , १ पेटंट, फार्मसी अभ्यासक्रमाची ४ पुस्तके प्रकाशित केले आहेत. झरेकाठी या गावातील पीएचडी पदवी अगदी कमी वयात प्राप्त केलेले ते प्रथम असून त्यांचे वडील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहिले मच्छिंद्र रामनाथ वाणी यांचे मार्गदर्शन लाभले.






