
सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर नेवसे यांच्या संकल्पनेतून एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर राज्य शासन व वन विभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे याच अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण व त्यात असणाऱ्या जीवसृष्टीची माहिती मिळावी यासाठी रेहकुरी अभयारण्य येथे एक दिवसीय महाविद्यालयीन सहल व वन सफरचे आयोजन करण्यात आले.
सद्गुरु कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कर्जत येथील काळवीट अभयारण्यास भेट दिली.
राष्ट्रीय वन महोत्सव राज्यात साजरा केला जात असताना नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना वने वन्यजीव तसेच वन्यजीवांचे मानवासाठी असलेले महत्त्व याची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांना वन्यजीवाबद्दल अधिक माहिती होऊन त्यांना त्यांच्याविषयी अभ्यास करण्याची जागरूकता निर्माण व्हावी या धारणेतून सद्गुरु कृषी महाविद्यालय , मिरजगाव मधील विद्यार्थ्यांची एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.
यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालयाची प्राचार्य माननीय डॉ. रामदास बिटे सर , प्रशासकीय अधिकारी मा. सखाराम राजळे सर, संस्थेचे समन्वयक सुरज जाधव सर, प्रथम वर्षाचे वर्ग समन्वयक प्रा. नितीन काळुंगे, प्रा. सुहास म्हेत्रे सर, प्रा. दीपक बुटे सर, प्रा. अक्षय कुलथे सर, प्रा. डॉ. श्रुती कदम मॅडम, प्रा. रवींद्र पाटील सर, प्रा. चांगदेव माने सर, प्रा. महेश कुतवळ सर, प्रा. अक्षय क्षीरसागर सर प्राध्यापक जानवी चांदे मॅडम, प्रा. अमित मगर सर तसेच रेहकुरी वनपरिक्षेत्र अधिकारी मारुती मुळे सर, वनक्षेत्राधिकारी निलेश जाधव सर अरुण साळवे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी जंगलातील विविध वन्य संपत्ती चे निरीक्षण केले, माळढोक पक्षी हरीण ससे काळवीट यांच्यासाठी उभारण्यात आलेले पानवटे व इतर सुविधा यांची पाहणी केली व सहलीचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच अभयारण्यामध्ये असलेल्या संग्रहालयाला भेट देऊन विविध प्रकारचे पक्षी सरपटणारे प्राणी यांची दुर्मिळ छायाचित्र पाहण्याचा आनंद लुटला.
तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अभयारण्याला लागून असलेल्या नर्सरीमधील विविध प्रकारचे फुलझाडे फळझाडे इत्यादींची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व देऊन निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे नैसर्गिक अन्नसाखळी टिकली तरच निसर्ग समृद्ध होईल निसर्गाचे प्रत्येक घटकाचे संवर्धन झाले पाहिजे. त्यामुळे आपणास शुद्ध हवा पाणी अन्न आणि निवारा या गोष्टी मिळू शकतील. तसेच नर्सरी मधील कलम करण्याची पद्धती, कलम कसे करावे कोणत्या प्रकारचा खुंट वापरावा नर्सरीमध्ये कशा प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख चांगदेव माने सर यांनी केले.






