
कोपर्डी जिल्हा परिषद शाळेस सामाजिक बांधिलकीची भावना जपत आ.रोहित दादा पवार यांचे मार्गदर्शनातून कोपर्डी कृषिरत्न फार्मर प्रोडूसर कंपनीचे वतीने चेअरमेन सौ. सारिका सुद्रिक , श्री अँड सुरज ट्रेडिंग कंपनी सुरत चे संचालक व कोपर्डी चे सरपंच शांतीलाल सुद्रिक , किसान ट्रेडिंग कंपनी कोपर्डी चे संचालक अशोक सुद्रिक , एम टेक सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे चे संचालक तात्यासाहेब सुद्रिक यांनी चार संगणक आज शाळेत भेट दिले .
बदलत्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये या उदात्त हेतूने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत संगणक भेट दिले.यावेळी सर्व शिक्षकांनी यावेळी आभार व्यक्त केले .
यावेळी हरिश्चंद्र सुद्रिक , सुभाष सुद्रिक , नितीन सुद्रिक , विष्णू सुद्रिक , विक्रम सूद्रिक पोपट सुद्रिक , मुख्याध्यापक फाफले सर , शेळके सर , गाढवे सर , गोरे सर विद्यार्थी उपस्थित होते .






