मास्टर बेंचप्रेस चॅम्पियनशिप मध्ये सुप्रिया सुपेकरला रौप्यपदक 

Google search engine

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमन वेल्थ क्लासिक ज्युनिअर , ज्युनिअर पावर लिफ्टींग अँड क्लासिक सब ज्युनिअर अँड मास्टर बेंचप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेत शेतकरी कुटुंबातील सुप्रिया पांडुरंग सुपेकर हीने रौप्यपदक पटकावले.

५२ किलो गटामध्ये झालेल्या स्पर्धेत इंग्लंड व पाकिस्तानातील प्रतीस्पर्ध्यांसोबत खेळत रौप्यपदक मिळविले.यापूर्वीही सुप्रिया सुपेकर हीने २०२३ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या एशियन पॅसीफिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून यश मिळवले होते.

सुपेकर हिच्या यशात वडील पांडुरंग सुपेकर , आई कांचन सुपेकरयांचे मोलाचे योगदान आहे.तसेच तिचे प्रशिक्षक डॉ.शर्वरी इनामदार यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.यावेळी बोलताना सुप्रिया सुपेकर म्हणाली , पॉवर लिफ्टिंग ची मला लहानपणापासूनची आवड होती.माझ्या यशामागे आई वडिलांनी दिलेला पाठिंबा आणि दर्शविलेल्या विश्वासामुळे मी यश मिळवू शकले.

येणाऱ्या काळात ही पॉवर लिफ्टींगच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यास कटिबद्ध राहणार आहे .