
२०१९ ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात मोठी विकासकामे केली. सर्व समस्या वैयक्तीत पातळीवर मिटवल्या व कर्जत जामखेड विकासाच्या मार्गावर असणारा मतदारसंघ अशी हळू हळू ओळख निर्माण केली.
आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत .चौदा हजार सायकल वाटप, रायटिंग पॅड, कोरोना काळात शाळांसाठी सॅनीटायजर , मास्क वाटप करण्यात आले.
आमदार रोहित दादा पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघामध्ये त्यांनी कोट्यवधीची विकासकामे केली .ग्रामीण रुग्णालय, शंभर बेडचे रुग्णालय, पंचायत समिती ऑफिस, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत ,बचत गट, निर्धूर चूल वाटप,शालेय विद्यार्थ्यांसाठी मोपत सायकल वाटप ,महिलांसाठी आरोग्य सुविधा व शिबिरे, जलसंधारण, पाणीपुरवठा, अशी अनेक विकासकामे करत आ.रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात विकास गंगा आणली. आ.रोहित दादा पवार हेच २०२४ विधानसभेला कोट्यवधी रुपयांच्या विकासकांना बळावर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया रविंद्र परहर यांनी दिली
आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार राहनार असून कोट्यवधींच्या विकासकामांतून आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असल्याची प्रतिक्रिया रविंद्र परहर यांनी दिली .
यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हे त्यांच्या विजयाचे द्योतक आहे. गेली वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची राज्यात आदर्श मतदार संघ म्हणून ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हेच विधान सभेचे उमेदवार असून गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी ते निवडून येतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे ४५ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले . त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न त्यांनी सोडलवे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी १९००० सायकल वाटप केल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आली. शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई , खरीप पीक विमा , शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन , शेतकरी सहलमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पेरणी, खत व्यवस्थापन , पाणी व्यवस्थापन , लागवड आदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन , शेतकरी कंपन्यांना ५० कोटी अनुदान देण्यात आले .
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप , महिलाना निर्धुर चुलीचे वाटप , मुलींसाठी तेजस्विनी बस , मोफत आरोग्य तपासणी शिबिर , यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या व इतर अनेक विकास असा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील
राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड एमआयडीसी होईल व येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल
अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली .नाला खोलीकरण , शेतकऱ्यांसाठी गोडाऊन , भजनी मंडळींना भजन साहित्य वाटप , तलाठी कार्यालये , रमाई आवास योजनेअंतर्गत कुटुंबांना घरकुल आदी कोट्यवधींच्या विकासकामांमुळे रोहित दादा हेच २०२४ ला आमदार होतील. अशी प्रतिक्रिया रवींद्र परहर यांनी दिली.






