विविध मागण्यांसाठी कौडाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू , मागण्या मान्य न झाल्यास नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा 

Google search engine

 

कौडाणे येथील सरपंच प्रवीण सुद्रीक उपसरपंच शहाजी शरद, अनील गंगावणे, सुद्रीक भाऊ , बंडू सूर्यवंशी माजी सरपंच उमेश गंगावणे , कल्याण जगधने , काळूराम सुद्रीक , बाळू थोरात, संपत सुद्रीक , नवनाथ शिंदे , राजेंद्र सुद्रिक, नितीन गंगावने, दत्ता सूद्रीक,निखिल सुद्रीक

व गावातील ग्रामस्थांनी गावच्या विविध मागण्यांसाठी आजपासून हनुमान मंदिर , कौडाणे

येथे आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास नगर सोलापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कौडाणे येथील अनिल गंगावणे व ग्रामस्थांनी आजपासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून कौडाणे येथील ग्रामस्थांनी ४ एप्रिल २०१८ रोजी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. यावेळी तत्कालीन पालकमंत्री मा. राम शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर संबंधित उपोषण स्थगित करण्यात आले होते .परंतु त्यातील कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही.यातील फक्त कौडाणे ते कोंभळी एकच काम रस्त्याचे काम करण्यात आले परंतु ते कामही अपूर्णच आहे . तसेच कौडाणे ते चांदे बुद्रुक रस्त्याचे कामही अपूर्णच असून ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे .कौडाणे ते बिटकेवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून तात्काळ डांबरीकरण पूर्ण करण्यात यावे.कौडाणे येथील वनविभागाचे माळढोक अभयारण्यासाठीचे आरक्षण तात्काळ हटवून जाचक अटी कमी कराव्यात.कौडाणे येथील शाळकरी विद्यार्थ्यांना सकाळी ०९:०० व ०५:०० वाजता एस.टी.बसची मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी.गावामध्ये बी. एस. एन. एल टॉवर ची उभारणी तात्काळ करावी.प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र

कौडाणे येथेच चालू करावे , जिल्हा परिषद शाळा येथे वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून तेथे नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे .जलजीवन मिशन अंतर्गत ११, गाव पाणी पुरवठ्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे .