
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील पोपटराव धुमाळ यांना देण्यात आला. अहमदनगर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दरवर्षी साजरा केला जातो २०२४ मधील हा सोहळा अहमदनगर मध्ये दिमाखात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन सरपंच उपस्थित होते . यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे सह दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील पोपटराव धुमाळ यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात गावात भरीव कार्य केले. गावात श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले तर स्वच्छता मोहीम ही राबविण्यात आली. गावातील लोकांना विविध योजनाचा लाभ मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. धुमाळ हे आदर्श शेतकरी ही असून त्यांनी माळरानावर द्राक्षबाग फुलवून आपल्या मेहनतीने शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवत सर्वांसमोर आदर्श ठेवला. पुणे येथील प्रसिद्ध हद्यरोग तज्ञ डॉ जगदीश हिरेमठ यांनी आपल्या संपूर्ण टीम सह त्याच्या द्राक्ष बागेला भेट दिली होती. सरपंच धुमाळ यांनी अनेकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्याच्या चौफेर कार्यामुळे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविले असून या पुरस्कार प्रसंगी दादासाहेब क्षीरसागर, अशोक खुडे, बालाजी गदादे, अशीफ सय्यद, आदी सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सरपंच म्हणून काम करताना आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सूनंदाताई पवार यांनी विविध प्रकारे मार्गदर्शन करत मदत ही केली तर गावातील काम पाहून राजस्थान येथील आदर्श ग्राम पींपलांत्रीचे आदर्श सरपंच पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांची बेनवडी गावाला भेट घडवून आणली होती. त्याच्या मार्गदर्शनामुळे गावाला विशेष वळण लागण्यासाठी मदत घडत असल्याचे दिसत आहे .






