
कर्जत तालुक्यातील सुपे येथील कवी, लेखक रामदास अवचर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नक्षत्राच देण काव्य मंचचे साईराजे पब्लिकेशन पुणे यांनी ते केले आहे. व रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, पुणे येथे ते नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमाला पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन मा. कृष्णकुमार गोयल, बालभारती पाठ्यपुस्तक संपादन मंडळाचे माजी सदस्य मा. श्रीकांत चौगुले, बोल्ड कवी म.भा.चव्हाण पुणे, समाज सेविका व कवयत्री अलका नाईक मुंबई, मिलिंद घोगरे, वसंतराव कुलकर्णी व नक्षत्राच देण काव्य मंच, पुणेचे प्रा.राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास अवचर यांचे “मृगजळ”, “सळसळपान”, “रानफुल”हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच “मराठी गौरव गाथा”, “नक्षत्रांचा काव्य झरा”, “बाप”, “प्रेमाचा फुलोरा”, “वेदनेचे फुल”, “पाऊस मनातला”इत्यादी प्रतिनिधिक काव्यसंग्रह ही प्रकाशित आहेत.
शिवाय दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंक यामध्ये अनेक कथा, कविता, वात्रटिका प्रकाशित आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या “मृगजळ” व “सळसळपान”या दोन काव्यसंग्रहाला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड (राज्य विक्रम)चे सर्टिफिकेट ही मिळालेले आहे. शिवाय त्यांना आता नुकताच नक्षत्राचं देणं काव्य मंच, पुणे यांचे वतीने उत्तम कवी व कार्यकर्त्यांना देण्यात येणारा “नक्षत्र गौरव पुरस्कार” ही जाहीर करण्यात आलेला आहे.






