
नुकतीच प्रो कबड्डी सीजन ११ साठीच्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये दादा पाटील महाविद्यालयाचा एम एस. सी वर्गात शिकत असलेला संभाजी वाबळे याची प्रो कबड्डीमध्ये निवड झाली आहे. त्याने आतापर्यंत महाविद्यालयीन स्तरावर अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. त्याला शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, सर्व विषयांचे विभाग प्रमुख, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






