मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक २०२४ लढविणार : विशाल मांडगे

Google search engine

 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड विधानसभा सकल मराठा समाज निवडणूक लढविणार असल्याची माहिती सकल मराठा समाज समन्वयक विशाल मांडगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.या पत्रकात म्हटले आहे की, कर्जत तालुका हा उठावाच्या अन्याय, शोषणाच्या करणाऱ्यांच्या विरोधात फार पूर्वीपासून ठाकेलला आहे . मराठा समाजाला हक्काचे आरक्षण पाहिजे यासाठी स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वेळा मागणी करण्यात आली आहे.एवढेच नाही तर मराठ्यांना कुणबी मधून तात्काळ आरक्षण द्यावे यासाठी मराठा नेत्यांनी मागणी केली . पण त्या लढ्याला यश आले नाही .कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीला अत्याचार करून ठार मारल्यानंतर तेव्हा मराठा समाजाने अनायाविरुद्ध जो विशाल मोर्चा काढला .त्यानंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे शांततेत निघाले.त्यानंतरच्या काळात मराठा समाज आक्रमक झालेला आपण पहिला . आंतरवली सराटी मध्ये पोलिसांच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आंदोलकांनी ताठर भूमिका घेवून चळवळ सुरू केली .आंतरवली सराटी येथे मराठा समाजाला महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना एक आश्वासक चेहरा मिळाला. मराठा सूर्य मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या पूर्ण व्यवस्थेला हतबल करून महाराष्ट्रात मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले.मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी प्रमाणे सकल मराठा समाज कर्जत तालुका येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणार आहे.ओबीसी मधून तात्काळ आरक्षण देण्यात यावे अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून त्या दृष्टीने गाव बैठका , चावडी बैठका सकल मराठा समाज भूमिका घेणार असून मतदार संघातील सर्वांशी चर्चा करणार असून योग्य उमेदवार देणार असल्याची प्रतिक्रिया इंजिनियर विशाल मांडगे यांनी दिली.