सेट परीक्षेमध्ये सौ.रेश्मा नवनाथ दिवेकर यांचे उज्ज्वल यश 

Google search engine

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल सोमवार दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत ७२७३ वि‌द्यार्थ्यांनी पात्र ठरले असून परीक्षेचा निकाल ६.६६ टक्के लागला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठातील सेट विभागाच्या वतीने ७ एप्रिल २०२४ रोजी १७ शहरांमधील विविध महावि‌द्यालयात ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील १ लाख ९ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये वरवंड गावचे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. मच्छिन्द्र आण्णा दिवेकर यांच्या सुनबाई सौ. रेश्मा नवनाथ दिवेकर यांनी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे.या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत पात्र झाल्याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्या प्रा. नवनाथ दिवेकर (सर) यांच्या सुविद्य पत्नी आहेत.त्यांचे वरवंड पंचक्रोशी व ग्रामस्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. रेश्मा नवनाथ दिवेकर या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल गावामध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी दौंड तालुक्याचे मा.आमदार रमेश थोरात यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला. व रेश्मा नवनाथ दिवेकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.