
तालुक्यातील खैदानवाडी येथील हरिश्चंद्र जाधव यांना नुकताच राष्ट्रीय आयडीयल फार्मर अवॉर्ड पुरस्कार विघ्नहर सांस्कृतिक भवन , ओझर ता .जुन्नर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. कर्नल डॉ .पी.जी.पाटील , कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी , प्रा.नितीन बानगुडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयडीयल फाउंडेशन चे सचिव रवींद्र पाटील , अध्यक्ष प्रकाश औताडे, उपाध्यक्ष वैभवकुमार जाधव आदी उपस्थित होते.
हरिश्चंद्र जाधव यांनी सुरुवातीला ३ एकर पासून द्राक्ष बागेला सुरुवात केली होती. या मध्ये त्यांनी एस.एस.एल, आर.के, अनुष्का , माणिकचमन जाती घेतल्या. त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करत १० एकर द्राक्ष बाग धरली असून चालू वर्षी त्यांना १० एकर मधून ७२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे .
त्यामधून १८ ते १९ लाख रुपये खर्च झाला .
त्यांनी त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये वेदर स्टेशन Soil Moisture Sensor बसवले आहेत . ज्यामुळे त्यांना पाऊस कधी येऊ शकतो , वारा कसा असू शकतो ऊन किती असू शकते, बागेला पाणी कधी व किती दिले पाहिजे याची माहिती मोबाईल वरती मिळत राहते .
त्यामुळे त्यांचा फवारणीचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते . त्यांना यासाठी श्रीराम कृषी सेवा केंद्राचे प्रो. सौदागर जाधव , सुमित बोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले.







