
श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील चतुर्थ वर्षातील सातव्या सत्रातील विद्यार्थीच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव ( रावे ) अंतर्गत पारगाव, निंबवी, आढळगाव, घोडेगाव येथे कृषिदूत म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने आढळगाव मध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता
दिपक सुपेकर (तालुका कृषि अधिकारी, श्रीगोंदा , मनोज सुर्यवंशी , मंडळ कृषी अधिकारी, श्रीगोंदा व तसेच नंदकुमार घोडके , कृषी तंत्रज्ञान सहाय्यक व्यवस्थापन, आत्मा श्रीगोंदा उपस्थीत होते
शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रविण ननावरे , ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी, मंचर , प्रतिक मोरे डेवलपमेंट मॅनेजर, वेस्टर्न रीजन IIL , केतन भोंगळे व योगेश राऊत , स्काय ऍग्रो ड्रीप इरिगेशन, बारामती व तसेच नंदकुमार खैरे , सुरभी बायो केयर, बारामती , महेश रूपनवर , सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा दौंड आणि माऊली हिरवे , प्रगतशील शेतकरी, माऊली कृषी उदयोग समूह पारगाव सुद्रिक लाभले.
तसेच या प्रसंगी आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ तसेच घोडेगावचे सरपंच रामदास घोडके व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. नंदकुमार खैरे सर यांनी शेतकऱ्यांना जैविक शेती विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की , माती परीक्षण, पाण्याचा समु त्याचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम, मातीतील सूक्ष्म जिवानवर रासायनिक घटकंचा परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रीन गोल्ड नर्सरी चे श ननावरे सर यांनी विविध रोपांची निवड कशी करावी, चंगल्या रोपांचे पीक उत्पादनामध्ये असणारे महत्व, रोपे कशी तयार करावी व चांगली रोपे कशी निवडावी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रतीक मोरे सर यांनी विविध कीटकनाशके व विविध पिकांमधील किड नियंत्रण इ. मुद्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच केतन भोगळे सर यांनी सूक्ष्म सिंचन साठी ड्रीप व स्प्रिंकलर संच निवडताना घ्यावयाची काळजी, त्याचे निगा कशी राखावी, योग्य दाबाची ड्रीप कशी निवडावी याविषयी माहिती दिली. महेश रुपनवर सर यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, ग्रुप शेती, शेतकरी उत्पादक कंपनी कशी काढावी व त्याद्वारे विविध शासकीय योजनानचा लाभ घ्यावा असे सांगितले. सर्वात शेवटी श्रीगोंदा तालुका कृषि अधिकारी दिपक सुपेकर सर यांनी शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध अडचणी सोडवायला कृषि विभाग कसा मदत करतो यावर मार्गदर्शन केले.
याच वेळी साईकृपा कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी त्याठिकाणी उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम अधिकारी घोडके सर व दळवी सर आणि कार्यक्रम समन्वयक रचना घोडके मॅडम तसेच सर्व कृषीदूत व कृषीकन्यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कुऱ्हे व ओंकार थोरात यांनी केले व आभार प्रदर्शन अस्मिता पिचड हीने केले.
या कार्यक्रमासाठी कृषीदुतांना श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम, संस्थेचे रजिस्टार कल्याण शिंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एच.निंबाळकर सर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.






