
जलजीवन पाईपलाईनच्या नावाखाली कुळधरण पिंपळवाडी डांबरी रस्ता भवरा वस्तीजवळ उखरला असून गेली सहा महिन्यांपासून हा रस्ता कमला भवानी मंदिराच्यासमोर अनधिकृतपणे कोणतीही परवानगी न घेता हा रस्ता उखरल्याने गावातील व प्रवाशांचे अपघात असून गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.निवेदनावर सतीश जंजिरे , सचिन जंजीरे , भाऊसाहेब जंजिरे, युवराज जंजिरे , स्वप्नील जंजिरे , शिवाजी दरेकर आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.






