राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवडीबद्दल आदिती चिखलेचा मिरजगाव मध्ये सत्कार 

Google search engine

मिरजगाव येथील रूरल एज्युकेशन सोसायटीचे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव तालुका कर्जत येथील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी.आदिती संजय चिखले हिची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये निवड झाल्याबद्दल तिचे मिरजगाव परिसरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

तिच्या या यशामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक, अनभुले क्लासेसचे शिक्षक, व तिचे शिक्षक असलेले आई-वडील श्री संजय चिखले व श्रीमती मनीषा साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तिला मिळालेल्या या यशाबद्दल तिला शिकवणारे शिक्षक श्री. दळवी सर आणि आदिती हिचा सत्कार मिरजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .प्रशांत त्रंबके साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक श्री दीपक कारंजकर, श्री योगेश खेडकर ,श्री महेश धोंगडे ,श्री बाळू ठोंबरे, श्री कैलास शिंदे सर, श्री संदीप कुमार गोरे सर ,श्री कुलांगे सर ,श्री पिंपरे सर ,श्री अतुल धालपे सर आदी उपस्थित होते.