परीटवाडी ग्रामस्थांचे सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू , आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा 

Google search engine

 

सौरऊर्जा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली वृक्षतोड , राशीन ते परिटवाडी रस्त्यालगतच्या वृक्षारोपनासाठी अडथळा निर्माण करणारी विद्युत पुरवठा लाईन हटवण्यात यावी , किंवा ही लाईन अंडर ग्राउंड करण्यात यावी वृक्षतोडीचे भरपाई म्हणून कमीत कमी १००० झाडे लावणे , लावलेल्या झाडांची तीन वर्ष संगोपन करणे , लोकवस्तीच्या बाजूने दगड विटांची सुरक्षित भिंत बांधणे , प्रकल्पाच्या कामासाठी स्थानिक लोकांना पात्रतेनुसार ७० टकके प्राधान्य द्यावे .आदी मागण्यांसाठी कर्जत तालुक्यातील परिटवाडी ग्रामस्थ तसेच पर्यावरण प्रेमिंच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अधिकाऱ्यांनी कोणतेही आश्वासन न दिल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.यासंबंधी तहसीलदार , पोलीस निरीक्षक , आ.रोहीत पवार तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की , सौर ऊर्जा प्रकल्पाचा विस्तार अंदाजे ६० एकर असल्यामुळे या ठिकाणी ५० ते ७० वर्षापूर्वीची असलेल्या मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आलेली असून नवीन वृक्ष अद्याप पर्यंत लावण्यात आलेली नाहीत.त्यामुळे राशीन परिटवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी . व त्याचे संगोपन करण्याची लेखी हमी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्यात येईल . असा इशारा पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी दिला आहे .

 

 

 

संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती.ती मुदत २० जुलै २०२४ रोजी संपली आहे. परंतु त्यांनी कोणती ही कामे केली नाहीत त्यामुळे आश्वासन नको , काम तात्काळ चालू करा .

 पर्यावरण प्रेमी , परिटवाडी