
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीटवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित केला होता. बालगोपाळ आपला पारंपारिक सांस्कृतिक वारसा जपत वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. मनमोहक विठू माऊलीची मूर्ती, तुकारामांची तुकाराम गाथा ,हिरवीगार अशी वृक्षांची रोपे व टाळ मृदुंगाचा गजर हे दिंडीतील मनमोहक दृश्य पाहून ग्रामस्थ सुखावले होते. यामध्ये गावातील सर्व भजनी मंडळी व काका महाराज हे सहभागी झाले होते. बालदिंडी सोहळ्याला मिळालेला उत्स्फूर्त असा पालकांचा, विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सहभाग, सेवा उल्लेखनीय व वाखाणण्याजोगी होती. यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही उक्ती आज खऱ्या अर्थाने सार्थक झाली .माऊलींच्या गजरामध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीटवाडी येथून ते विठ्ठल मंदिरापर्यंत पाई वारी संपन्न झाली. या बालगोपाळांच्या दिंडीचे अवचित्य साधून ग्रामस्थांनी सर्व वारकरी व बालगोपाळांसाठी नाष्टा आणि चहापाण्याची सोय केली होती त्याबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे धन्यवाद मानले. केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे व मुख्याध्यापक संपत फरांडे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम घेण्यात आला. या नव उपक्रमासाठी गणेश भोसले, प्रवीण शहाणे, आशितोष लोखंडे, नितीन पवार, दिपाली शेजाळ या सर्वांचे सहकार्य लाभले.






