शंभूराजे स्कूलचे विद्यार्थी विठूनामाच्या जयघोषाने झाले दिंडीत दंग

Google search engine

 

प्रतिनिधी :- प्रा. राज खराडे

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे पब्लिक स्कूलने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.ही दिंडी सिद्धटेक पासून भांबोरा या ठिकाणी काढण्यात आली.यामध्ये सर्व विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी सहभाग घेतला प्रत्येक विद्यार्थ्याने वारकऱ्यांचा वेष धारण करत हाती टाळ,झेंडे,पताका घेत विठूनामाचा जायघोष केला.विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानबा तुकाराम,आशाप्रकारे जयघोष करत विद्यार्थी भजनात दंग झाल्याचे दिसून आले.भांबोरा या ठिकाणी दिंडी आल्यानंतर ग्रामस्थांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे गीत,उखाणे,अभंग तसेच समाज प्रबोधनपर एक नाट्य सादर केले.त्यानंतर विठ्ठलाची पुजाकरून आरती घेण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यात सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.