माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्याकडून पठाण कुटुंबियांचे सांत्वन   आ.शिंदेंनी पत्रकार पठाण यांच्या निवासस्थानी भेट देवून केली विचारपूस 

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मोहंमद पठाण यांच्या निवासस्थानी मंगळवार दि.१६ रोजी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी सांत्वनपर भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

मिरजगाव येथील पत्रकार मोहंमद पठाण यांच्या मातोश्री नजमा उमरभाई पठाण ( वय ८६ ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मंगळवारी माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस करुन या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, सरपंच नितिन खेतमाळस, संपत बावडकर, डॉ.रामदास टकले, दत्ताभाऊ मुळे, भाऊसाहेब गावडे, अशोक काकडे, एकनाथ हेंबाडे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निवासस्थानी येवून सांत्वनपर भेट दिली .