मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना संगणक परिचालकास धक्काबुक्की

Google search engine

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आज दुरगाव येथे मोठी गर्दी जमा झाली होती. अशातच सर्वर प्रॉब्लेम असल्याने फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ लागत होता. अशातच अन्सार जब्बार शेख याने संगणक परिचालक यांना माझा पहिला नंबर घ्या , असे म्हणत संगणक परिचालक यांना मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्की केली .

सर्वर व्यवस्थित चालू नसल्याने वेळ लागत होता. त्या व्यक्तीला अनेकांनी समजावून की सर्वर प्रॉब्लेम आहे परंतु अन्सार शेख याने सर्वांच्या अगोदर माझा नंबर घ्या असा आग्रह करत शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला .