न्यू इंग्लिश स्कूल , अळसुंदे विद्यालयात विद्यार्थी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

Google search engine

 

महाराष्ट्र ,कर्नाटक व तेलंगाना राज्यातून सुद्धा लाखोच्या संख्येने स्वयंशिस्तीने दिंडीच्या माध्यमातून वारकरी मार्गस्थ झालेले आहेत आणि ते आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुरतेने चालत आहेत.

या वारीच्या दरम्यान चालणाऱ्या वारकऱ्यांच्या विविध बाबी उदाहरणार्थ पाऊली, गोल रिंगण, श्रमपरिहारासाठी फुगडी, मनोरंजक एकनाथ महाराजांच्या भारुडांचे सादरीकरण, वारी दरम्यानची प्रवचने कीर्तने, पंढरपुरातील नगर प्रदक्षिणा इत्यादी बाबींचे विद्यालयात राहून प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देण्यासाठी विद्यालयाने विद्यार्थी वारकरी दिंडीचे आयोजन केले होते.

विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री परहर आर. व्ही. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग हा काव्यप्रकार विद्यार्थ्यांना समजावा यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक श्री सुनील गोरखे सर यांनी अभंग सादर करून भक्तीमय वातावरण निर्मिती विद्यालयात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिंडीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. ग्राम प्रदक्षिणेनंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी फुगडी चा मनमुराद आनंद घेतला त्याचबरोबर पाऊली खेळत वारकऱ्यांच्या जीवनाशी समरस झाले. मुक्कामाच्या ठिकाणी असणारे गोल रिंगण याचाही प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

धर्म जातीच्या पलीकडे जाऊन संस्कृती जतन व संवर्धनासाठी विद्यालय अशाच प्रकारचे अनेक उपक्रम नेहमी राबवत असते, माननीय मुख्याध्यापक श्री परहर आर व्ही यांच्या मार्गदर्शनाखाली सहशालेय उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य, शाळा व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य,पालक शिक्षक संघाचे सन्माननीय सदस्य, माता पालक संघाचे सन्माननीय सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बनसुडे एम.डी. सर, श्री कांबळे पी.ए. सर, श्री विधाते आर एन सर व श्री जगताप एन ए यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.