अफसरभाई शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी निवड

Google search engine

 

सामाजिक कार्यकर्ते अफसरभाई शेख उर्फ ताजुभाई यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा , तालुका अध्यक्ष ॲड.बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.त्यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की , राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष मा.सुनिलजी तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहाल व पक्षवाढीसाठी आपले सहकार्य राहील.निवडीबद्दल अफसरभाई शेख यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.