Forest Service Examination मध्ये घवघवीत यश; राजू सुखदेव वाघमोरे यांची 10वी रँकने Forest Range Officer (Executive) पदी निवड

Google search engine

 

 

वडगाव दरेकर (ता. दौंड, जि. पुणे) येथील होतकरू व कर्तृत्ववान युवक राजू सुखदेव वाघमोरे यांनी भारत सरकारच्या केंद्रशासित प्रदेशांसाठी घेण्यात आलेल्या Forest Service Examination मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत Forest Range Officer (Executive) या प्रतिष्ठित पदावर 10वी रँक मिळवून यश संपादन केले आहे. त्यांच्या या भरीव यशामुळे संपूर्ण वडगाव दरेकर गावासह दौंड तालुक्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू वाघमोरे हे वडगाव दरेकर येथील रहिवासी आहेत. वडगाव दरेकर चे माजी सरपंच सुखदेव वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत. वडील सुखदेव वाघमारे, बंधू रवींद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवले आहे.

राजू वाघमारे यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. Forest Service Examination ही परीक्षा देशपातळीवर अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते. अशा परीक्षेत 10वी रँक मिळवणे हे मोठे यश मानले जाते.

लहानपणापासूनच शिस्त, निसर्गप्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या राजूंनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवत अनेक अडचणींवर मात केली. अभ्यासात सातत्य, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीमुळे त्यांनी हे यश साध्य केले. त्यांच्या निवडीमुळे वनसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्याची त्यांची तयारी अधोरेखित होते.

या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून राजू वाघमोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांनीही त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळाली असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.राजू सुखदेव वाघमोरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.