
कोकणगाव कार्यकारी सेवा सोसायटी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत चेअरमन पदी सौ.अनुसया शहाजी बोरुडे यांची तर व्हाइस चेअरमन पदी श्री.बाबासाहेब गवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सभासद, शेतकरी व ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनियुक्त चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीवेळी डॉ. योगेश बोरुडे, अभंग बोरुडे, तात्याशेठ बोरुडे, संदीप बोरुडे, प्रकाश बोरुडे, धनंजय सूर्यवंशी, दादासाहेब सूर्यवंशी, संजय खराडे, प्रमोद सकुडे, बाप्पू पवार, भास्कर चव्हाण, अजिनाथ बोरुडे सर, भास्कर गवारे, परशुराम चौरे, संजय मापारी, गुलाब गवारे, शरद गवारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या नेतृत्वाखाली संस्थेची सर्वांगीण प्रगती, शेतकरी व सभासदांचे हितसंवर्धन आणि सहकार चळवळीचे बळकटीकरण व्हावे.नवनिर्वाचित चेअरमन अनुसया शहाजी बोरुडे व व्हाईस चेअरमन बाबासाहेब गवारे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!डॉ योगेश बोरुडे यांनी या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.






