
मिरजगाव व परिसरातील नागरिकांसाठी त्वचारोग व केसांच्या विविध समस्यांवर प्रभावी, सुरक्षित आणि आधुनिक उपचार मिळावेत या उद्देशाने डॉ. बोरुडे हॉस्पिटल येथे दि. ३ मार्च ते १५ मार्च या कालावधीत मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “त्वचेच्या उपचारासाठी एकमेव ठिकाण” अशी ओळख असलेल्या या हॉस्पिटलमध्ये स्कीन, हेअर, लेझर आणि जनरल डर्मेटोलॉजीसाठी सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध आहेत.या शिबिरात डॉ. सोनाली बोरुडे आणि डॉ. योगेश बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांकडून रुग्णांची सविस्तर तपासणी व योग्य सल्ला दिला जाणार आहे. त्वचा व केसांच्या दीर्घकाळ त्रास देणाऱ्या समस्यांवर आधुनिक पद्धतीने उपचार, लेझर थेरपी आणि कॉस्मेटिक सोल्युशन्स यांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.
त्वचेच्या समस्यांवर खात्रीशीर उपचार
या शिबिरात चेहऱ्यावरील मुरुम व खड्डे, काळे डाग, वांग व पांढरे डाग, मस–तीळ–जामखिळी काढणे, डोळ्याखालील काळेपणा, गजकर्ण/नायटे, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस, नागिन सोरायसिस तसेच त्वचेचे सर्व विकार यावर तपासणी व उपचार सल्ला दिला जाणार आहे. टॅटू व जन्मखुणा काढणे, सुरकुत्या कमी करणे यासारख्या उपचारांसाठीही सुविधा उपलब्ध आहेत.
कॉस्मेटिक उपचारांची विस्तृत श्रेणी
रुग्णांच्या सौंदर्यविषयक गरजा लक्षात घेऊन अॅडव्हान्स मेडिकेटेड फेशियल, बी.बी. ग्लो फेशियल, कार्बन लेझर फेशियल, ब्युटी स्पॉट काढणे, स्किन पॉलिशिंग, केमिकल पील/फिलिंग, पी.आर.पी., व्हॅम्पायर फेशियल, मेसोथेरपी, स्काल्प पिग्मेंटेशन तसेच विशेष ब्रायडल पॅकेज यांचा समावेश आहे. केसांच्या समस्यांवर तज्ञ मार्गदर्शन
केस गळती, कोंडा, केसांतील चाई, टक्कल पडणे, अनावश्यक केस (लव) काढणे तसेच हेअर पी.आर.पी. यांसाठी आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. वैयक्तिक गरजेनुसार उपचार योजना आखली जाते.
विशेष सवलत
शिबिराच्या कालावधीत सर्व औषधे व स्किन प्रॉडक्ट्सवर १५% सूट देण्यात येणार असून, रुग्णांसाठी हा मोठा लाभ ठरणार आहे.
क्लिनिकची वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५
पत्ता: बस स्टॅन्ड समोर, एच.डी.एफ.सी. बँक खाली, तळमजला, मिरजगाव
संपर्क: डॉ. सोनाली बोरुडे – ९४२३८१४५४८ | डॉ. योगेश बोरुडे – ८९९९३७४६४८
त्वचा व केसांच्या समस्यांवर योग्य वेळी तज्ञ सल्ला व उपचार घेण्यासाठी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बोरुडे हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.






