काष्टीतील टॉपर्स अकॅडेमीचे JEE Main – २०२६ मध्ये दैदिप्यमान यश

0
275
Google search engine

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या JEE Main 2026 (Session 1) परीक्षेत टॉपर्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत शिवम शितोळे (९८.९९), आर्या शेळके (९८.९३), मयूर यादव (९८.९२) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीचा लौकिक वाढवला.

तसेच द्रोन लगड, अनुराधा हराळ, भूमि काळे विद्यार्थ्यांनीही ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाइल तर अभिषेक काशिद, शुभम कळमकर, दीप लगड विद्यार्थ्यांनीही ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाइल व पायल कुरुमकर, सार्थक टकले, भक्ती जाधव, यशराज गरुड, रोहित गव्हाणे, सिद्धेश थोरात, गौरव शेळके, अनुष्का थोरात, राधा रोडे, ओंकार वेताळ, हर्षराज चौधरी, शुभम काळे या विद्यार्थ्यांनीही ९४ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश मिळवले.

२२ पैकी एकूण २१ विद्यार्थ्यांनी ९४ पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवत ग्रामीण भागात टॉपर्स अकॅडमीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संस्थेचे संचालक प्रा. गणेश कळसकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील एप्रिल सत्रासाठी अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले.