मिरजगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. मोनाली ऋषिकेश मुळे इच्छुक

Google search engine

मिरजगाव जिल्हा परिषद गटातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. मोनाली ऋषिकेश मुळे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शवली असून मिरजगाव गटांत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेतल्यामुळे सौ. मोनाली मुळे यांचे नाव सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलेच परिचित झाले आहे.

मुळेवाडी व परिसरात मुळे कुटुंबाचे मोठे राजकीय व सामाजिक वलय असून, अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनात या कुटुंबाचा ठसा उमटलेला आहे. सौ. मोनाली मुळे यांचे सासरे हे जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता असून, प्रशासकीय अनुभव आणि समाजाशी असलेले निकटचे नाते यामुळे कुटुंबास मोठा मान-सन्मान लाभलेला आहे. तसेच त्यांचे चुलत सासरे हे माजी सरपंच राहिले असून, ग्रामविकासाच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या आज्जे सासरे तब्बल 18 वर्षे सरपंचपद भूषवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

सौ. मोनाली मुळे या स्वतः उच्चशिक्षित असून, त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञानाची जाण आणि प्रशासनाची समज या गुणांच्या बळावर त्या विकासाभिमुख नेतृत्व देऊ शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. महिलांचे प्रश्न, युवकांचे रोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यांवर त्या ठोस भूमिका मांडताना दिसत आहेत.

त्यांचे पती हे नामांकित बांधकाम व्यावसायिक असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख आहे. याशिवाय ते माजी युवक काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले असल्याने त्यांना मोठा जनसंपर्क व अनुभव आहे. या पार्श्वभूमीमुळे सौ. मोनाली मुळे यांच्या राजकीय वाटचालीला भक्कम पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.मोठा जनसंपर्क, व्यापक मित्रपरिवार आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग यामुळे सौ. मोनाली मुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिरजगाव जिल्हा परिषद गटासाठी सक्षम उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यास त्या निवडणूक रिंगणात उतरून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचे राजकारण पुढे नेतील, अशी अपेक्षा कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत. मिरजगाव गटातील राजकीय समीकरणांवर त्यांच्या उमेदवारीचा निश्चितच परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.