काशीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था दुरगाव कडून आकर्षक एफ.डी.(ठेव)योजना; १ ते २ वर्षांच्या मुदतठेवीवर द.सा.द.शे ११% व्याजदर!

Google search engine

 

दुरगाव परिसरात व ग्रामीण भागात पारदर्शक व्यवहाराची परंपरा व सहकार क्षेत्राची मुहूर्तमेड उभा करून महिलांना व पुरुषांना आर्थिक सबळता देणे, बचत विषयी संस्कृती वाढविणे आणि सदस्यांना व सभासदांना उच्च परतावा मिळवून देण्यासाठी काशीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दुरगाव यांनी एक अत्यंत आकर्षक योजना जाहीर केली आहे. “विश्वासाचं नातं इथे समृद्ध होतं!” या घोषवाक्याला साजेशी अशी ही लाभदायी योजना असून १ ते २ वर्षांच्या मुदत ठेवीवर तब्बल द.सा.द.शे-११ टक्के व्याजदर मिळणार आहे तसेच दामदुप्पट ठेव 84 महिने व दामदीडपट ठेव 48 महिने असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील महिलांच्या तसेच युवकांना व्यावसायिक यांना आर्थिक उन्नतीसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी बचत हे महत्त्वाचे साधन आहे. तसेच संस्थेकडून ग्रामीण भागातील महिलांच्या व व्यावसायिक सभासदांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेकडून सोने तारण कर्ज, व्यवसाय कर्ज, शेती कर्ज या कर्ज योजना देखील दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर संस्थेची ही योजना विशेष ठरणार आहे. अल्प कालावधीत जास्त परतावा मिळवून देणारी ही योजना असल्याने महिलांबरोबरच कुटुंबांनाही आर्थिक स्थैर्य साध्य करण्यात मदत होणार आहे.

संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या या एफ.डी. योजनेंतर्गत १ वर्ष ते २ वर्षे इतक्या कालावधीसाठी ठेव स्वीकारल्या जाणार आहेत. या कालावधीत ठेवदारांना द.सा.द.शे-११% दराने हमी व्याज मिळणार असून, सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा या दोन्हींची हमी संस्थेने दिली आहे. बचत खातेदार, महिला बचत गटातील सदस्य तसेच संस्थेचे इतर सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

काशीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने अत्यल्प कालावधीत ग्रामीण भागात विश्वासार्हपणे आर्थिक सेवा पुरवित, अनेक महिलांना रोजगार, स्वावलंबन व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या या नव्या निर्णयामुळे अधिकाधिक सभासदांना व नागरिकांना बचतीकडे प्रवृत्त होण्यास आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया घालण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तसेच दुरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी बचत खाते उघडून व्यवहार करावेत

दुरगाव परिसरातील तसेच नांदगाव, कुळधरण, गुंडाचीवाडी, वडगाव तनपुरा, थेरवडी, पिंपळवाडी व आसपासच्या खेड्यातील ज्या इच्छुकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधून अधिक माहिती घेऊन लवकरात लवकर आपली एफ.डी. नोंदवावी, असे आवाहन संस्थेच्या चेअरमन सौ.भगत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

मो. नं – 9405566211

मो. नं – 8591872835