प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व श्री. राणा सटवा बिटके यांचा शताब्दी महोत्सव, सहस्र चंद्र दर्शन सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा 1 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार

Google search engine

 

बिटकेवाडी (ता. कर्जत) येथे श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा मेळ साधणारा एक भव्य सोहळा साजरा होणार आहे. वय हा केवळ आकडा असून उत्साह, समर्पण आणि सकारात्मक ऊर्जेने जीवन जगता येते, याचा प्रेरणादायी आदर्श देणारे श्री. राणा सटवा बिटके यांच्या शताब्दी महोत्सव, सहस्र चंद्र दर्शन सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. “कामासाठी वय नसते, तर उत्साह लागतो,” या विचारांना साजेसा जीवनप्रवास करत समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणा सटवा बिटके यांना या औचित्याने हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे.

या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून श्री. झुंबर राणा बिटके, श्री. छगन राणा बिटके, श्री. भगवान राणा बिटके तसेच संपूर्ण बिटके परिवार उत्साहाने आयोजनाची धुरा सांभाळत आहेत. गाव, परिसर आणि नातलगांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण असून मान्यवरांचे हार्दिक स्वागत करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी किर्तन मूर्ती ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील यांचे हरिकीर्तन सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. भक्तीभाव, संस्कृती आणि परिवार एकत्र येण्याचा हा सोहळा गुरुवार दि. ०१/०१/२०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपन्न होणार असून या मंगलप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ठिकाण: बिटकेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

हा शताब्दी सोहळा म्हणजे एका शतकभराच्या समृद्ध अनुभवांना वंदन करत पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठेवणारा सुवर्णक्षण आहे. समस्त बिटके परिवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.