
“निरोगी माती निरोगी अन्न पिकवते आणि निरोगी अन्न शरीर निरोगी ठेवते” या उत्तम संकल्पनेला साकार रूप देत ” विठाई नॅचरल्स ” गेल्या काही वर्षांपासून शुद्ध, पारंपरिक आणि विषमुक्त अन्नधान्यांचे उत्पादन करून ग्राहकांचा विश्वास संपादन करत आहे.
चापडगाव ता. कर्जत येथे जून २०२० पासून सुरु झालेली शुद्ध नैसर्गिक शेती विठाई नॅचरल्सच्या संचालिका गीतांजली शंकर जाधव व साक्षी ऋषिकेश जाधव जून २०२० पासून चापडगाव ता. कर्जत येथे संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेतीची सुरुवात केली. पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून या शेतीत रासायनिक खते व कीटकनाशकांचा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. जमिनीची सुपिकता वाढविणे, मातीतील सूक्ष्मजीव जिवंत ठेवणे, देशी वाणांना प्राधान्य देणे आणि आरोग्यदायी अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
केवळ स्वतःच नव्हे तर इतर शेतकऱ्यांनाही नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी विठाई नॅचरल्स मार्गदर्शन करत आहे. विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जोडून नैसर्गिक शेतीचे जाळे अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत सातत्याने होत आहेत. विशेष म्हणजे, विठाई फार्मला कोणतीही व्यक्ती कधीही भेट देऊ शकते, ही पारदर्शकता हीच त्यांच्या विश्वासाची मोठी खूण आहे.
सामान्य अन्नधान्य आणि विषमुक्त अन्नधान्य यातील फरक म्हणजे बाजारातील प्रक्रियायुक्त धान्यांवर ब्लीचिंग, पॉलिशिंग व केमिकल ट्रीटमेंट केली जाते, परिणामी पोषणमूल्य घटते तसेच रासायनिक अवशेष राहतात. दुसरीकडे, विठाई नॅचरल्समध्ये पारंपरिक स्वच्छता प्रक्रियेद्वारे अन्नधान्य तयार केले जाते, ज्यामुळे नैसर्गिक सुगंध, चव, फायबर आणि पोषणमूल्य अबाधित राहते. यामुळे हे अन्न केवळ स्वादिष्ट नाही, तर आरोग्यदायी, सुरक्षित आणि ऊर्जा देणारे आहे.
उत्तम दर्जाची नैसर्गिक उत्पादने थेट शेतातून तुमच्या घरी
विठाई नॅचरल्सकडून मुग, मूगडाळ, तूरडाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, बाजरी, नाचणी, खपली गहू तसेच विविध पिठे, मसाले, गुळ उत्पादने, नैसर्गिक ज्युस, लाडू, बिस्कीट, चटण्या, सांडगे, आवळा उत्पादने यांसह अनेक दर्जेदार आणि 100% नैसर्गिक उत्पादने उपलब्ध आहेत. सर्व उत्पादने Residue Free असल्याचा विश्वास ग्राहकांना दिला जातो.
कर्जत येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात डोम क्र. 03 व स्टॉल क्र. 15 वर विठाई नॅचरल्सचा आकर्षक स्टॉल उभारण्यात आला आहे.
दिनांक : 1 ते 5 जानेवारी 2026
वेळ : सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत
ग्राहक व शेतकरी बांधवांनी या स्टॉलला भेट देऊन नैसर्गिक शेती, शुद्ध उत्पादन प्रक्रिया व उपलब्ध अन्नधान्य यांची माहिती घेण्याचे व खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘विठाई नॅचरल्स’ – निसर्ग शुद्ध, निसर्गाचा खरा आस्वाद!
रासायनिक खतांविना, उत्तम दर्जा, देशी बियाण्यांचा वापर आणि आरोग्याला प्राधान्य हा या उपक्रमाचा पाया आहे. “आमच्या शेतातून थेट तुमच्या घरात” या ध्येयाने विठाई नॅचरल्स निरोगी समाज निर्मितीसाठी योगदान देत आहे.
संपर्कासाठी :
७२१९७८४८१२
९९६०८९३१४१
शुद्ध, नैसर्गिक, स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नाचा आनंद घ्या!
लोकेशन :- चापडगाव ता. कर्जत






