कर्जत येथे गीता ज्वेलर्स तर्फे दीपावली व लग्नसराई महोत्सवानिमित्त भव्य लकी ड्रॉ सोडत उत्साहात संपन्न

0
362
Google search engine

कर्जत शहरातील प्रतिष्ठित व विश्वासार्ह असा ठसा उमटवलेल्या ‘गीता ज्वेलर्स’ तर्फे दीपावली व लग्नसराई महोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रमाचा समारोप अत्यंत उत्साहात व जल्लोषात झाला. ग्राहकांचा वाढता विश्वास, त्यांचे सहकार्य आणि सदैव मिळणारे प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक आणि मोलाची बक्षिसे यामुळे या लकी ड्रॉला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बाजारतळ येथील गीता ज्वेलर्सच्या मुख्य शाखेत पार पडलेल्या या सोडत कार्यक्रमास ग्राहकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. जे ग्राहक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी विशेष सोय म्हणून सोडतीचे थेट प्रक्षेपण इंस्टाग्राम लाईव्हवरून करण्यात आले. त्यामुळे दूरवर असलेल्या ग्राहकांनाही या सोहळ्याचा आनंद घेता आला.

या भव्य लकी ड्रॉसाठी विजेत्यांसाठी खास आकर्षक बक्षिसांची मनोहर शृंखला ठेवण्यात आली होती. त्यामध्ये प्रथम बक्षीस म्हणून स्कूटी विजेते सय्यद अबीदली दऊतली यांच्या नावावर जाहीर करण्यात आले. द्वितीय बक्षीस म्हणून इलेक्ट्रिक स्कूटी शिंदे हरिश्चंद्र बाबा यांना मिळाले. तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन वरडूळे जालिंदर सोनबा यांनी पटकावले. चतुर्थ बक्षीस म्हणून आटा चिक्की नितीन रानमाळ तर पाचवे बक्षीस सायकल विजय घनवट यांच्या नावावर घोषित करण्यात आले. सर्व विजेत्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

कर्जत व परिसरातील नागरिकांनी गीता ज्वेलर्सवर दाखवलेला विश्वास व प्रेम आमच्यासाठी प्रेरणादायी असून हा संपूर्ण उपक्रम पूर्णपणे पारदर्शकपणे राबवण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्राहकांचे समाधान व आनंद हेच आमचे प्राधान्य असल्याचे प्रो. प्रा. अतुल भालचंद्र कुलथे व हरिओम अतुल कुलथे यांनी सांगितले. दर्जेदार दागिने, आधुनिक डिझाईन्स, वाजवी दर व विश्वासार्ह सेवा यांच्या जोरावर गीता ज्वेलर्सने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या लकी ड्रॉ उपक्रमामुळे संस्था व ग्राहकांतील विश्वासाचे नाते आणखी दृढ झाले आहे.

या सोहळ्याला अनेक ग्राहक, हितचिंतक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे सोहळ्याला विशेष आकर्षकता प्राप्त झाली.

स्थान : गीता ज्वेलर्स, बाजारतळ, कर्जत, जि. अहिल्यानगर
संपर्क : ९६८५९४९४९४ / ९७३०५१५१११
इंस्टाग्राम लाईव्ह आयडी : geeta_jewellers_