मकर संक्रांतीनिमित्त कर्जत शहरातील नवी पेठ येथे विरा 1 ग्रॅम ज्वेलरी कलेक्शनतर्फे पारंपरिक, रजवाडी व आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले अस्सल दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू झाले आहे. या प्रदर्शनात महिलांसाठी मन मोहून टाकणारे विविध प्रकारचे नक्षीदार दागिने उपलब्ध असून विशेष म्हणजे या सर्व दागिन्यांवर तब्बल 20 टक्के विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. ही आकर्षक ऑफर 15 जानेवारीपर्यंत लागू असेल.मकर संक्रांत हा सण सौंदर्य, सोज्वळता आणि नव्या आनंदाचा प्रतीक मानला जातो. परंपरेला आधुनिकतेची जोड देणारे दागिने सण-समारंभ, हळदी-कुंकू, विवाहसोहळे तसेच इतर खास प्रसंगांसाठी महिलांची पहिली पसंती ठरतात. हे लक्षात घेऊन विरा कलेक्शनने रजवाडी, हेरिटेज, अँटिक, सोरसकी तसेच विविध 1 ग्रॅम ज्वेलरीचे समृद्ध कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे.ग्राहकांच्या सोयीसाठी आकर्षक डिझाईन्सचे हार, गळ्यातील सुंदर माळा, नथ, झुमके, कानातले, बांगड्या, मंगळसूत्र, चोकर्स असे अनेक प्रकारचे दागिने येथे पाहायला मिळतात. दर्जेदार मटेरियल, सुंदर नक्षीकाम आणि किफायतशीर दर ही या कलेक्शनची खास वैशिष्ट्ये असल्याने महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.याशिवाय ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे ५०० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हमखास भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीसोबत आनंदाची जोड मिळणार आहे.या उपक्रमाबाबत बोलताना आयोजक प्रा. प्रा. प्रियंका शुभम कुलथे यांनी सांगितले की, “सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना सर्वोत्तम आणि दर्जेदार दागिने किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. वेगवेगळ्या संस्कृतींचा वारसा जपणारे दागिने एकाच छताखाली मिळावेत, यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. सर्व कर्जतवासियांना आणि परिसरातील महिलांना या संधीचा नक्की लाभ घ्यावा,” असे त्यांनी आवाहन केले.
ग्राहकांना अधिक माहितीसाठी प्रो. प्रा. प्रियंका शुभम कुलथे – 8600006022 / 9156997777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे ठिकाण: नवी पेठ, कर्जत, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.
सणासुदीच्या या खरेदीमहोत्सवात पारंपरिकतेची झळाळी, आधुनिकतेचा स्पर्श आणि आकर्षक सवलतीचा लाभ – हे तिघेही अनुभवण्यासाठी महिलांनी नक्की भेट द्यावी, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिला ग्राहकांकडून मिळत आहे.






