
दादा पाटील महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, गुणवत्ता सुधार अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महालिंग डोंगरे उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. डोंगरे यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे. हे धोरण मनाने आणि शरीराने स्वीकारा, शिक्षणात नवनवीन आव्हाने येत असतात आणि ती स्वीकारावी लागतात. प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्ये असतात. त्या कौशल्याच्या विकासासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात आले आहे. एनइपीमध्ये लवचिकता आहे. कौशल्य बाजारात विकत मिळत नसतात तर ते स्वतः विकसित करावे लागते. सकारात्मक व सर्व अंगाने विचार करा असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले की, पालक आणि मुले ही दोघेही या शैक्षणिक धोरणामुळे चिंतेत आहेत, मात्र घाबरून न जाता धाडसाने या नवीन धोरणाला सामोरे जायचे आहे. क्षमतांना विकसित करण्यासाठी शैक्षणिक धोरणात बदल झाला आहे. एनइपी विचार करायला भाग पाडते. प्रात्यक्षिकाने हे नवीन धोरण आपल्याला आत्मसात करता येईल असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.भागवत यादव, आय.क्यू.सी समन्वयक डॉ. संदीप पै, प्रथम वर्षातील सर्व विभागांचे विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी पालक यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी एनईपीचे समन्वय डॉ.अजित इंगळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व डॉ. प्रतिमा पवार यांनी केले. या कार्यशाळेचे आभार उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले






