७९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न : किशोर गांगर्डे

Google search engine

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना ३० जून १९४६ रोजी झाली.संस्थेचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.अहमदनगर पाटबंधारे विभागाचे मा.कार्यकारी अभियंता तथा संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील काळे साहेब व विद्यमान चेअरमन किशोर गांगर्डे, व्हा. चेअरमन दीपक वाघ , ज्येष्ठ संचालक दत्तात्रय गडाख व मा.संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संस्थेचा वर्धापन दिन माऊली सांस्कृतिक सभागृह झोपडी कॅन्टीन ,सावेडी रोड अहमदनगर येथे साजरा करण्यात आला.
सभासदांचे सहकार्य व ठेवीदारांचा विश्वास यामुळे संस्थेने ३१ मार्च २०२४ अखेर ३०९ कोटींची उलाढाल केली असून भाग भांडवल सुमारे ६ कोटी ३५ लाख असून ठेवी (मुदत व संचित ठेवी) रुपये सुमारे ८६ कोटी आहे.जिल्हा बँकेत सुरक्षित गुंतवणूक २१ कोटी ३२ लाख आहे .कर्ज देणी बाकी रुपये ८८ कोटी ५४ लाख आहे .संस्थेच्या सन २०२३-२४ मध्ये सुमारे ८ कोटी ३२ लाखांचा ढोबळ नफा झाला असून सुमारे ६५ लाख ५२ हजार निव्वळ नफा झाला आहे.जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात कमी व्याज दराने कर्जवाटप करणारी संस्था ठरली आहे .विद्यमान संचालक मंडळाने २३-२४ सालाकरिता ८% दराने लाभांश , ६%दराने संचित ठेवींवर व्याज व मासीक
वरग्निवर ३% दराने व्याजाची रक्कम देणेबाबत शिफारस केलेली होती, त्यास आमसभेने एकमताने मंजुरी दिली.संस्थेकडे नमुद सभासदांचे बँक खात्यावर सदरची रक्कम तात्काळ म्हणजेच दि.०२.०७.२०२४ रोजी वर्ग झाल्यामुळे मा . सभासद बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तसेच संस्थेतून ‘सभासदत्व रदद’ झालेल्या सभासदांची ही लाभांश व संचित ठेव व्याजाची रक्कम बँक खात्यावर वर्ग केलेली आहे.
संस्थेचे थकबाकीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याबाबत आनंद व्यक्त केला. या पतसंस्थेने सभासदांसाठी व त्यांचे कुटुंबियांचे भवितव्याचा विचार करून अनेक कल्याणकारी योजना राबविल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच ही पतसंस्था सभासदांना त्यांच्या आर्थिक गरजा, अडचणीं भागविणेसाठी उदा. मुलां-मुलींचे लग्न, पाल्यांचे उच्च तांत्रिक शिक्षण, स्थावर मिळकत (घरबांधणी-घरदुरूस्ती) हृदयशस्त्रक्रिया सारख्या मोठया खर्चिक वैद्यकीय उपचारासाठी वगैरे कारणांसाठी सभासदांना कमीत-कमी व्याजदराने तात्काळ वित्तपुरवठा करणेचे संस्थेचे धोरण खरोखरच विशेष उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्थेने सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविलेल्या आहेत. उदा.- मयत सभासदांचे वारसांस सभासद कल्याण निधीतुन रू.३०००००/- चेअरमन फंडातून मयत सभासदांचे वारसांस तातडीने रू.१००००/-, धर्मदाय फंडातुन रू. ५० हजारापेक्षा जास्त वैद्यकीय खर्च झालेला असेल तर तातडीने आर्थिक मदत दिली जाते.
संस्थेने दि. ०५.०६.२०२४ अखेर सभासद असलेल्या सभासदांचा रू ६ लाख रकमेचा वैयक्तिक अपघात विमा उतरविलेला असुन संस्थेतुन सेवानिवृत्त वा सभासदत्व रद्द झालेल्या सभासदांना सुद्धा अपघात विमा पॉलीसीची मुदत संपेपर्यत विमा पॉलीसीचा लाभ मिळणार आहे. वैयक्तिक अपघात विमा पॉलीसीची मुदत एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
यावेळी मा. सभासद बंधूंनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे विद्यमान चेअरमन किशोर गांगर्डे , व्हा. चेअरमन दिपक वाघ व वेळप्रसंगी मा. संचालक मंडळ सदस्यांनी व संस्थेचे प्रमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समर्पक उत्तरे देऊन सभेस उपस्थित सभासद बंधू-भगिनींचे समाधान केले.
विद्यमान संचालक मंडळ भविष्यात सभासदाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम कारभार करून संस्थेचे हित पाहून सभासदांना जास्तीत-जास्त फायदा देणेचे प्रयत्न करील. तसेच संस्था लवकरच स्व-भांडवलावर उभी राहणेसाठी व सभासदांच्या सोईसाठी सर्व आर्थिकव्यवहार लवकरच ऑनलाईन करणेसाठी विद्यमान संचालक मंडळ कसोशीने प्रयत्न करील, असे संस्थेचे विद्यमान चेअरमन किशोर गांगर्डे यांनी सांगितले. सर्व सभासदांचे सहकार्यानि संस्थेचे कामकाज अधिकत्तम कार्यवान, पारदर्शक, सभासदाभिमुख होणेसाठी व संस्था उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहाणेसाठी संचालक मंडळाचे वतीने विद्यमान चेअरमन किशोर गांगर्डे यांनी आश्वासन दिले.
सभेस उपस्थित सभासदानी संस्थेच्या उत्कृष्ठ कारभाराबददल आभार मानुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने सर्वसाधारण सभेची सांगता करणेत आली. वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे संचालक मंडळ सदस्य मा. व्हा. चेअरमन सर्वश्री दिपक वाघ, संगमनेर शाखा कार्यप्रमुख अशोक राशिनकर, श्रीगोंदा शाखा कार्य प्रमुख संतोष जायभाय, बीरानपुर शाखा कार्यप्रमुख गणेश कवडेपाटील शेवगांव शाखा कार्यप्रमुख संदीप शेरकर, दत्तात्रय आवारी, सुरेश ढोमसे, देविदास शेटे, रविंद्र यादव, संदीप पवार, जगदीश वाघ, अरविंद वाव्हळ, संभाजी निमसे, विशाल सरोदे, महेश भावसार, किशोर सांगळे, रामदास पालवे, महिला संचालक सौ. अमृता पोड, सौ. अर्च ना गायकवाड (निकाळजे), सौ. प्रियंका मिसाळ, तज्ञ संचालक सर्वश्री दत्तात्रय गडाख, शेखलाल सय्यद, बाळासाहेब गाडे, समिर पठाण, राजेंद्र परदेशी, गणेश सुपेकर व सन्माननीय सभासद मोठया संख्येने उपस्थित होते . वार्षिक सर्व साधारण सभेचे सुत्रसंचालन संस्थेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर शिंदे व संचालक मंडळ सदस्य श्री. संदीप शेरकर व श्री. विशाल सरोदे यांनी व आभार प्रदर्शन मा. व्हा. चेअरमन दिपक वाघ यांनी केले.