
आ .राम शिंदे यांनी मुंबई अधिवेशनामध्ये एमआयडीसी साठी सातत्यपूर्ण आणि वेगवान पाठपुरावा केला आहे . त्यामुळे एमआयडीसी, कर्जत साठी महत्वपूर्ण कंटूर सर्व्हेक्षणासाठी बुधवारी ३जुलै रोजी औद्योगिक विकास महामंडळाची टीम प्रस्तावित जागेवर दाखल होणार आहे . या महत्वपूर्ण सर्व्हेक्षणानंतर प्रस्तावित जागेचा भुसंपादनाचा मार्ग मोकळा होणार असून त्यामुळे लवकरच कर्जत जामखेडकरांचे, युवकांचे एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण होणार आहे .
एमआयडीसी, भूसंपदना पूर्वीचे रुपरेखा सर्व्हेक्षण ( contour survey ) बुधवारी दि. ३ जुलै २०२४ औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व्हेक्षण पथक कर्जत मध्ये येणार असून प्रस्तावित जागेचे सर्व्हेक्षण करणार आहे .
आ प्रा राम शिंदे साहेब यांनी अथक प्रयत्नांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव येथे ४८१.९८ हेक्टर क्षेत्र प्रसावित असलेल्या औद्योगिक वसाहती साठी १५ मार्च रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीने तत्वतः मान्यता दिली होती त्यामुळे पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करणेसाठी संबंधिताना आदेशित होते .
शेतकरी, नागरिक यांना एमआयडीसी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून,सर्वसामान्य माणसांना बैठकांसाठी आमंत्रित करून त्या बैठकांमधून जागा निश्चिती केली .
उच्चस्तरीय अधिकार मुंबई, बैठकीत संबधित प्रस्तावाची चर्चा होऊन प्रस्तावित जागेस १३ मार्चच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली त्यामुळे प्रकरण ६, कलम २ खंड(ग ) प्रमाणे कार्यवाही साठी प्रस्तावित जागेसाठी सुरु झाली .
प्रस्तावित जागेचे रुपरेखा सर्व्हेक्षण झाल्यानंतर महत्वाचा टप्पा पार होऊन प्रस्तावित जागेचे प्रकरण ६ प्रमाणे भूसंपादन होऊन उद्योजकांना मागणीनुसार भूखंड वाटप होते . सर्वेक्षणाच्या महत्वपूर्ण टप्प्यानंतर लवकरच त्या जागी भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष खरमरे यांनी दिली .
चौकटी साठी :-
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या भागाचा सर्वांगिण विकास करणे यासाठीच माझा अग्रक्रम राहिलेला आहे . लोकांना वेठीस धरणे, सरंजामशाही वृत्ती, विकास कामात खोडा घालणे असा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबरोबर सर्वसामान्यांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे . प्रकरण ६ लागू होणेपूर्वी कंटूर सर्व्हेक्षणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण होऊन प्रस्तावित जागी नियोजित एमआयडीसी होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे . महायुती सरकारने कर्जत मधील युवकांच्या आशा आकांक्षेला प्रतिसाद देत अत्यंत विक्रमी कालावधीत एमआयडीसी साठी मंजुरी दिल्याने कर्जतच्या जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री, उदय सामंत यांचे खूप खूप आभार मानतो असे प्रतिपादन आ.राम शिंदे साहेब यांनी केले आहे .






