डॉ. संजय नगरकर यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेचा ‘बेस्ट प्रिन्सिपल’ अवॉर्ड

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना नुकताच मुंबई येथील इंडियन टॅलेट ऑलिम्पियाड संस्थेचा ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. सोनाटा कंपनीचे घड्याळ, रोख रक्कम २००० व् सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून नोहेंबर महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

 

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड ही मुंबई येथील संस्था गेली दहा वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील हुशार विद्यार्थी, प्रयोगशील शिक्षक व प्राचार्यांचा शोध घेऊन विविध प्रकारचे पुरस्कार देते. आय.आय.टी मुंबई, मद्रास, गुवाहाटी, हैद्राबाद, इन्फोसिस अशा संस्थांशी सलग्न आसलेल्या या संस्थेचा मिळालेला हा पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील व दलितमित्र दादा पाटील यांच्या विचारधारेप्रमाणे विद्यार्थी केंद्र मानून केलेल्या कार्याचा पुरस्कार असल्याने सदर पुरस्कार मी कर्मवीरांना समर्पित करतो व मिळणारी रक्कम गरीब विद्यार्थी फंडासाठी देणार असल्याची प्रतिक्रिया प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी दिली.

सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.नगरकर यांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन ॲड. भगिरथकाका शिंदे, सचिव विकास देशमुख, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष मा. राजेंद्र (तात्या) फाळके, जनरल बॉडी सदस्य व महविद्यालय विकास समिती सदस्य आमदार रोहितदादा पवार, महाविद्यालय विकास समिती सदस्य अंबादासजी पिसाळ, राजेंद्र (काका) निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्र तनपुरे व सर्व आजी माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी केले