
कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री.दत्त सांस्कृतिक सेवा संस्थेच्या अंतर्गत चैतन्य व्यसनमुक्ती सल्ला , उपचार व पूर्नवसन केंद्रास नॅशनल बेस्ट इंटिग्रेटेड रिहाबिलेशन सेंटर फॉर ॲडिक्ट्स २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
स्व. धीरज गोपाळ शर्मा यांनी २०११ मध्ये संस्थेची स्थापना करून २०१५ ला व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. आजतागायत अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे.
यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार राजाभाऊ वाजे , खासदार प्रतापरावजी जाधव , डॉ. एच ई. बासेम (पॅलेस्टाईन) , डॉ. महेंद्र शेटे हे मान्यवर उपस्थित होते. चैतन्य व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वैभव जंजीरे , सोमनाथ काळे यांना हा पुरस्कार देण्यात आला . सर्व कर्मचाऱ्यांचा परिश्रमामुळे हा गौरव करण्यात आला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता धीरज शर्मा, सचिव गोपाळ म .शर्मा. व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालक श्रीराम बरबडे, गोरखनाथ काळे यांनी सांगितले.






