दुरगाव गणातून संदीप ज्ञानदेव घालमे भाजपाकडून इच्छुक  , विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी संधी दिल्यास निवडणूक लढवणार 

0
163
Google search engine

 

दुरगाव गणातील आगामी पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून भाजपच्या संभाव्य उमेदवारीत एक नवे नाव चर्चेत आले आहे. शिंदा येथील रहिवासी संदीप ज्ञानदेव घालमे यांनी भाजपच्या तिकिटावरून पंचायत समिती निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी संधी दिल्यास आपण निवडणूक रिंगणात उतरण्यास पूर्णतः इच्छुक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

गावपातळीवरील प्रश्न, पायाभूत सुविधा, शेती विकास या विविध क्षेत्रांत स्वतः काम करण्याची इच्छा व्यक्त करत संदीप घालमे म्हणाले की, “दुरगाव गणातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. प्रा. राम शिंदे साहेबांचा विश्वास आणि आशिर्वाद लाभल्यास मी पक्षशिस्त पाळत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेन.”

भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत असून तरुण कार्यकर्त्यांचा विशेष पाठिंबा त्यांना लाभत असल्याचे सांगितले जाते. घालमे यांनी गेल्या काही वर्षांपासून गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांची गणातील ओळख एक सदैव उपलब्ध राहणारे, संयमी व जनसंपर्कात सक्रिय व्यक्तिमत्त्व अशी झाली आहे.

आगामी काही दिवसांत भाजपची अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार असल्याने दुरगाव गणामध्ये उत्सुकता वाढली आहे. संदीप घालमे यांच्या इच्छुकतेमुळे येथे राजकीय वातावरण अधिक रंगतदार होणार असून पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. स्थानिक पातळीवरील मतदारांचेही या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.

आता प्रा. राम शिंदे साहेबांची अंतिम भूमिका काय असेल आणि भाजप कोणावर विश्वास टाकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि, संदीप घालमे यांच्या इच्छुकतेमुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.