कापरेवाडी , शिंदेवाडी , बहीरोबावाडी मधील शेतीसाठी वीजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार : श्री. अनिल खराडे, श्री. शरद यादव

Google search engine

 

 

कापरेवाडी , शिंदेवाडी व बहीरोबावाडी परिसरातील शेतकऱ्यांना महावितरणकडून गेल्या अनेक वर्षांपासून, विशेषतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हंगामी कालावधीत फक्त एक दिवसाआड वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात गेल्या तीन वर्षांत अनेकवेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.

आज या संदर्भात श्री. डबीर साहेब , कार्यकारी अभियंता, कर्जत तसेच श्री. वारे साहेब , उपकार्यकारी अभियंता, कर्जत यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान ३ ते ४ आठवड्यांत प्रलंबित काम पूर्ण करून कृषी पंपांना रोजची वीजपुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

या मागणीसंदर्भातील बैठकीस कापरेवाडी सरपंच अनिल खराडे, बहीरोबावाडी सरपंच शरद यादव, सुनील काका यादव, बंटीभाऊ यादव, कापरेवाडी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भाऊ मोडके, बापूसाहेब मुळे, मछिंद्र खराडे, तसेच मालचंद पवार, शिवाजी शिंदे, बाळासाहेब खराडे, कालिदास रोकडे, शेखर पठाडे , दिलीप यादव व ईश्वर आबा तोरडमल , पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते.