शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायत चे मा.सरपंच निवृत्ती कानगुडे यांची राशीन मंडल चिटणीस पदी निवड कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Google search engine

 

 

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय राहून, पक्षनिष्ठा आणि संघटनशक्तीचा उत्तम नमुना सादर करणारे

शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायत चे मा.सरपंच निवृत्ती कानगुडे यांची नुकतीच राशीन मंडल तालुका चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत आणि अभिनंदन संपूर्ण कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले आहे.

शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायत चे मा.सरपंच निवृत्ती कानगुडे हे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला असून, पक्षविस्तार, संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या निष्ठेचे आणि कार्यक्षमतेचे फलित म्हणूनच त्यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल राशीन मंडल अध्यक्ष सुनील काळे, तसेच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी आशा व्यक्त केली की, निवृत्ती कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली मंडलाचे कार्य अधिक गतिमान आणि प्रभावी होईल.

निवड झाल्यानंतर शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायत चे मा.सरपंच निवृत्ती कानगुडे यांनी विश्वास व्यक्त केला की, “माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कायम राखेन. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या धोरणांचा प्रसार आणि जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहीन.”

या निवडीमुळे राशीन परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ठिकठिकाणी कानगुडे यांचे अभिनंदन होत आहे. त्यांची ही निवड पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.