चापडगाव पंचायत समिती  गणातून सरपंच अनिल अशोक खराडे इच्छुक 

Google search engine

कर्जत तालुक्यातील कापरेवाडी गावाचे सरपंच श्री. अनिल अशोक खराडे हे सध्या पंचायत समिती चापडगाव गणातून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. समाजकार्याची ओढ, गावाच्या विकासासाठी असलेली बांधिलकी आणि कार्यतत्परता यामुळे ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.

श्री. अनिल खराडे यांचा जन्म कापरेवाडी (ता. कर्जत, जि. अहिल्यनगर) येथे झाला. बालपणापासूनच त्यांना समाजसेवेची ओढ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढे विविध नामांकित संस्थांमध्ये साइट इंजिनिअर ते प्रोजेक्ट मॅनेजर या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

महावितरण (MSEDCL) अंतर्गत वीज वितरण प्रकल्पांवर काम करताना त्यांनी 1000 पेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मर यशस्वीरित्या बसविण्याचा विक्रम केला. कामाच्या अनुभवातून ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचे असंतुलन त्यांच्या लक्षात आले आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी खाजगी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र ठेकेदारी व्यवसाय सुरू केला.

महावितरण मान्यताप्राप्त ठेकेदार म्हणून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवल्या, नवे ट्रान्सफॉर्मर बसविले आणि लाईन देखभालीची कामे केली. त्यांच्या पुढाकाराने कापरेवाडीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य वीजदाब मिळावा म्हणून १० नवीन कृषी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले. इतकेच नव्हे तर गावाच्या विकासासाठी स्वतःच्या ५ लाख रुपयांच्या खर्चातून एक नवीन ट्रान्सफॉर्मरही बसविण्याचा त्यांनी आदर्श घालून दिला.

यासोबतच रस्ते विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, शेतकरी कल्याण, आरोग्य व ज्येष्ठ नागरिक कल्याण या क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची विनंती केली आणि प्रचंड जनसमर्थनामुळे ते कापरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले.

सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच गावाचा चेहरामोहरा बदलला. गावातील रस्ते काँक्रीट करणे, वीज वितरण व्यवस्था सुधारणा, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती व शेतकरी विकास अशा विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केली. अनेक कामे त्यांनी स्वतःच्या आर्थिक योगदानातून पूर्ण केली, तर अनेक प्रकल्पांसाठी शासन व स्थानिक प्रतिनिधींचा निधी मिळवून दिला.

मा. प्रा. राम शिंदे (सभापती, महाराष्ट्र विधान परिषद) यांच्या सहकार्याने त्यांनी गावासाठी सुमारे ₹१० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या निधीअंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व सार्वजनिक सुविधा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत.

आज कापरेवाडी-शिंदेवाडी परिसराचा विकास हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रतिक बनले आहे. या विकासाचा अनुकरणीय आदर्श शेजारच्या गावांमध्येही निर्माण झाला आहे. आता तेच विकासाचे मॉडेल पंचायत समिती पातळीवर घेऊन जाण्याचा संकल्प श्री. खराडे यांनी केला आहे.

चापडगाव गणातील गावांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी ते आता जनतेचा पाठिंबा मागत आहेत. “गावाचा सर्वांगीण विकास आणि शेतकरी-कामगार वर्गाचे जीवनमान उंचावणे” हा त्यांचा प्रमुख हेतू आहे.

त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ केला असून, मतदारांमध्ये “ग्रामविकासासाठी समर्पित – लोकसेवेसाठी तत्पर” या घोषवाक्याने सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.

📍 संपर्क कार्यालय: अनिल खराडे मित्रमंडळ

हर्षनील निवास, कर्जत–कापरेवाडी रोड, कापरेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

📞 संपर्क: 9423152121

ध्येय एकच —

“प्रत्येक गाव विकसित, प्रत्येक घर उज्ज्वल!”