भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राशीन मंडल उपाध्यक्षपदी तनिष्क बापू मोरे पाटील यांची निवड

Google search engine

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राशीन मंडल उपाध्यक्षपदी तनिष्क बापू मोरे पाटील यांची निवड

 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , राशीन मंडळाच्या उपाध्यक्षपदी तनिष्क बापू मोरे पाटील यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना नवे नेतृत्व लाभल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

तनिष्क मोरे पाटील हे लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असून, त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून युवकांना संघटित करण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या कार्यशैलीतून आणि उत्साही नेतृत्वातून युवा वर्गात प्रेरणा निर्माण झाली आहे.

या निवडीबद्दल विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब, श्रीगोंदा विधानसभा आमदार विक्रम पाचपुते , भाजपा राशीन मंडल अध्यक्ष सुनील काळे,

भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष श्री.धनंजय मोरे पाटील , लोकनियुक्त सरपंच खेड श्री.अमित मोरे पाटील , भाजपा निमंत्रित सदस्य अहिल्यानगर , मा.श्री.पोपटराव नारायणराव मोरे पाटील भाजपा निमंत्रित सदस्य अहिल्यानगर मा.श्री.शहाजीराजे राजेभोसले, भाजपा जिल्हासरचिटणीस श्री.सुदर्शन कोपनर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल सरकाळे पाटील,भाजपा खेड शाखाप्रमुख श्री.अनिल काकडे यांनी तनिष्क बापू मोरे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी आशा व्यक्त केली की तनिष्क मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा अधिक बळकट होईल आणि भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार तळागाळात अधिक प्रभावीपणे होईल.

विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या तनिष्क मोरे पाटील यांनी आपल्या निवडीनंतर सांगितले की, “युवा कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाच्या धोरणे आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे माझे प्रमुख ध्येय असेल. पक्षाने दाखविलेल्या विश्वासास मी कायम पात्र ठरेन.”

राशीन मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त करत त्यांचे सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले. या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुभेच्छुक-

सभापती विधानपरिषद महाराष्ट्र मा.श्री.प्रा.राम शिंदे साहेब,  आमदार (श्रीगोंदा-नगर मतदारसंघ) मा.श्री.विक्रमसिंह बबनराव पाचपुते,

भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष श्री.धनंजय मोरे पाटील ,लोकनियुक्त सरपंच खेड श्री.अमित मोरे पाटील ,भाजपा निमंत्रित सदस्य अहिल्यानगर मा.श्री.पोपटराव नारायणराव मोरे पाटील ,भाजपा खेड शाखाप्रमुख श्री.अनिल काकडे , भाजपा मा.तालुकाध्यक्ष डॉ.श्री.सुनील गावडे ,भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री.अमोल सांगळे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस अहिल्यानगर श्री.सुदर्शन कोपनर ,भाजपा निमंत्रित सदस्य अहिल्यानगर मा.श्री.शहाजीराजे राजेभोसले व राजेभोसले परिवार राशिन व सर्व भाजप पदाधिकारी व खेड ग्रामस्थ.