‘भारत उद्योगरत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ‘रुबाब जेन्टलमेन सलून’चे बाळासाहेब रंधवे यांना ‘बेस्ट हेअर आर्टिस्ट’ व ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट’ पुरस्काराने सन्मानित सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित 

Google search engine

 

प्रतिष्ठित ‘भारत उद्योगरत्न पुरस्कार 2025’ या भव्य सोहळ्यात सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘रुबाब जेंटलमेन’चे बाळासाहेब रंधवे यांना ‘बेस्ट हेअर आर्टिस्ट’ आणि ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट’ या दुहेरी सन्मानांनी गौरविण्यात आले.

हा पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यावसायिक, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि उद्योजक उपस्थित होते. बाळासाहेब रंधवे यांच्या स्टाइलिंग कौशल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच रुबाब मेन्स वेअर या ब्रँडला स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यांच्या हातातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन फॅशन ट्रेंड्सची जाण आणि ग्राहकांना दिला जाणारा वैयक्तिक स्पर्श यामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बाळासाहेब रंधवे म्हणाले,

“हा सन्मान केवळ माझ्यासाठी नाही, तर माझ्या संपूर्ण टीमसाठी आहे. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांचे हे बळ आहे. पुढेही आम्ही नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू.”

या प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही बाळासाहेब रंधवे यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की,

“फॅशन आणि ब्युटी क्षेत्रात मेहनत,हेयर विग , पॅच , क्रिएटिव्हिटी आणि समर्पण यांचा संगम दिसला पाहिजे. रंधवे यांचे कार्य त्याचे उत्तम उदाहरण आहे.”

‘भारत उद्योगरत्न पुरस्कार’ हा पुरस्कार उद्योग, कला, सौंदर्य आणि सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. या सन्मानामुळे बाळासाहेब रंधवे आणि रुबाब जेंटल मेन्सवेअर यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, मिरजगाव परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.