
कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावाचे मा. सरपंच व कर्जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश भाऊ सुद्रिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोपर्डी गावात सामाजिक बांधिलकी जपत एक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा कोपर्डी व जिल्हा परिषद शाळा कोपर्डी (हरणवाडी) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास कोपर्डी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये शेतकरी संघटना नेते लालासाहेब काशिनाथ सुद्रिक, शेतकरी नेते शिवाजी भीमराव सुद्रिक, माजी सरपंच बंकट किसान सुद्रिक, माजी उपसरपंच शिवाजी माणिक सुद्रिक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पप्पू शेठ सुद्रिक, उद्योजक जालिंदर सुद्रिक, अमोल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गीताराम सुद्रिक तसेच मुख्याध्यापक फफाळे सर व खराडे सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. समाजहिताचा विचार करून सरपंच सतीश भाऊ सुद्रिक यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. उपस्थित मान्यवरांनी सतीश भाऊ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा” दिल्या व त्यांच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कोपर्डी ग्रामस्थ आणि शालेय शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे सतीश भाऊ सुद्रिक यांचा वाढदिवस एक सामाजिक बनला असून, गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.






