
क्रीडा क्षेत्रात अपूर्व कामगिरी करीत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल कर्जत जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे. प्रवरानगर पब्लिक स्कूल ,प्रवरानगर ता.राहता या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत कुमार. अर्थव दिनेश ढवळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. या अभूतपूर्व यशामुळे त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. हे यश म्हणजे शाळेच्या शिस्तीचे आणि क्रीडागुणांच्या विकासाचे फलित आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संभाजी लांगोरे साहेब ,समन्वयक श्री.किरण नाईक सर , प्राचार्य श्री.शिवाजी पाटील सर, पर्यवेक्षक श्री.राजेंद्रकुमार काळे सर , क्रीडा प्रशिक्षक गणेश वायसे सर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विभागीय स्पर्धेतही आपला विद्यार्थी अधिक यश संपादन करेल, असा आम्हाला विश्वास आहे.






