श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलात बी.एड. आणि एम.एड. प्रथम वर्षाचे ‘स्वागत समारंभ’ उत्साहात संपन्न

Google search engine

घारगाव येथील श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या बी.एड. (B.Ed.) आणि एम.एड. (M.Ed.) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘स्वागत समारंभ’ उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेची आणि कार्यप्रणालीची नवीन विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल येथे संपन्न झाला.
शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची अनेक वर्षांची शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, हा या समारंभाचा मुख्य उद्देश होता. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालयात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलनाचे सचिव सौ. अर्चनाताई पानसरे मॅडम यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एम.बी.ए. इन्स्टिट्यूटचे डॉ. संतोष शिंदे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर हे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांचे भविष्य आणि एक प्रभावी शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण यावर मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. संतोष शिंदे यांनी आपल्या भाषणात, बदलत्या शैक्षणिक धोरणांनुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तर डॉ. किशोर निंबाळकर यांनी व्यावसायिक शिक्षणातून समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत शिक्षक कशा प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, हे स्पष्ट केले.
शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी महाविद्यालयातील विविध सोयीसुविधा, अद्ययावत ग्रंथालय, अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि वर्षभरातील नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यासात आणि महाविद्यालयाच्या नियमांचे पालन करण्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.प्राचार्य म्हणाले की, “या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ शिक्षक न बनता, एक आदर्श नागरिक आणि समाजाचा दिशादर्शक बनला पाहिजे. त्यासाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.कोळेकर टी.जे यांनी केली. त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी आणि सूत्रसंचालन प्रा. राजश्री शिंदे आणि प्रा. स्वप्नील शिंदे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. यामध्ये प्रा. प्रा. शेलार एस.बी. कराळे व्ही, प्रा. खेंडके पी.झेड प्रा. गोरे एस.एस., प्रा.भोईटे पी.एन. आणि प्रा. अवघडे व्ही.पी.यांचा समावेश होता. या सर्व प्राध्यापकांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या शिक्षण प्रवासात मार्गदर्शन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्रदर्शन प्रा.आहेर जी.डी. यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांततेत झाली. या स्वागत समारंभामुळे नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वातावरणाशी समरूप होण्याची आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होण्याची प्रेरणा मिळाली.