विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांची पवार हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट 

Google search engine

 

आज विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांनी कर्जत येथील डॉ.दयानंद पवार (स्त्री रोग तज्ञ, MBBS, DGO) व डॉ.श्वेता पवार (भूलतज्ञ, MBBS, DA – Gold Medalist) यांच्या ‘पवार हॉस्पिटल’ येथे सदिच्छा भेट दिली .यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री.बाळासाहेब पवार सर तसेच डॉक्टरांचे सासरे श्री.श्रीकृष्ण वारे (इंजिनियर, बृहन्मुंबई महानगरपालिका, रा. रत्नापूर, ता. जामखेड), श्री.मच्छिंद्र हाके, श्री.अशोकराव खेडकर, श्री.सचिन पोटरे, श्री.सचिन घुले पाटील, श्री.डॉ.प्रमोद जगताप, फार्मासिस्ट श्री.शैलेश हाके, लॅब टेक्निशियन श्री.वैभव गायकवाड, सौ.सीमा उकिरडे, श्री.सविता अडसूळ यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.राम शिंदे साहेब म्हणाले, आरोग्य सेवेत समर्पित भावनेने योगदान देणाऱ्या अशा तज्ज्ञ दाम्पत्याचे कार्य समाजासाठी मोठे वरदान ठरत आहे. त्यांची सेवाभावी वृत्ती व रुग्णांप्रती असलेली निष्ठा कौतुकास्पद आहे.