
स्व.वसंतदादा पाटील विद्यालय, अंबालिका नगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील वयोगटात दादा पाटील महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता संघ पात्र ठरलेला आहे. सदर मुलींचा कब्बडी संघ कर्जत तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्याला करणार आहे.
या संघामध्ये प्रांजली दिलीप कळसाईत, भाग्यश्री प्रकाश धनवडे, सपना शिवाजी मासाळ, वैष्णवी लहू कुमटकर, प्रतिक्षा संजय लाढाणे, तन्वी तात्या जगताप, प्रतीक्षा काळे, अपूर्वा बाळू कोकणे, वैष्णवी बाळू कदम, प्रिती लक्ष्मण तराटे हे खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. पवन कडू, प्रा. अशोक शिंदे महाविद्यालयाचे माजी राष्ट्रीय कबडीपटू भूषण ढेरे, सुभाष तनपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. आ.रोहित दादा पवार, मा. अंबादास पिसाळ, मा.राजेन्द्र काका निंबाळकर, मा.बप्पाजी धांडे,प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






