
बहिरोबावाडी येथील युवक कार्यकर्ते नितीन तोरडमल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला . मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय मुक्तागिरी शासकीय निवासस्थान येथे हा पक्ष प्रवेश पार पडला.
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील युवक कार्यकर्ते नितीन तोरड, स्वप्निल मोढळे, प्रसाद कानगुडे, विकास काळे, प्रतिक पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. व लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची जाहीर केले आहे.
नितीन तोरडमल हे कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय हुशार व कल्पक असे नेते म्हणून ओळखले जातात. मागील अनेक निवडणुकांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे. यामुळे कर्जत तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. तसेच तालुक्यातील राजकीय समीकरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता बदलणार आहेत. पक्ष प्रवेश केल्याबद्दल नितीन तोरडमल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रतिक्रिया
आज प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी शिवसेना पक्षात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला यावेळी अहील्यानगर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख बाबू शेठ टायरवाले तसेच युवासेना प्रमुख अभिषेक भोसले उपस्थित होते …!
जय श्रीराम ॐ जय महाराष्ट्र
डॉ.नितीन तोरडमल






